खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांच्या निधीतून चालवीला उपक्रम
गडचिरोली. वाचन संस्कृतीला चालना मिळावी तसेच स्पर्धा परीक्षांची प्रभावी तयारी करण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. डॉ. नामदेवजी किरसान साहेब यांच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, जुनी वडसा येथे उभारण्यात आलेल्या सुसज्ज अभ्यासिकेचे उद्घाटन आमदार मा. रामदासजी मसराम साहेब यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.या उद्घाटन सोहळ्यास महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी उपस्थिती राहून मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरांप्रमाणे दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या दूरदृष्टीतून खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांनी ही सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध करून दिली आहे. ही अभ्यासिका विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यास, नियमित अभ्यासाची सवय विकसित करण्यास तसेच स्पर्धा परीक्षा व विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरेल. ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम भविष्यात अनेक यशस्वी विद्यार्थी घडविण्यास निश्चितच मोलाचे योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष देसाईगंज राजेंद्र बुल्ले, नगराध्यक्षा सौ लताताई सौंदरकर, नगर परिषद उपाध्यक्ष नरेश विठलानी, सामाजिक कार्यकर्ते धनपाल मिसार सर,नगरसेवक तथा गटनेता विकास प्रधान, नगरसेवक श्याम उईके, पाणी पुरवठा सभापती सचिन खरखाटे, नगरसेवक विलास लोखंडे, नगरसेविका मंदा समर्थ, नगरसेविका फैमिदा पठाण, नगरसेविका लता मुळे, प्रकाश समर्थ, मुरलीधर सौंदरकर, हंसराज लांडगे सर, सागर वाढई कैलास वानखेडे, अश्विन मुळे, राजू मेश्राम,योगेश नेवारे, हाके सर, मस्के सर, देशपांडे मॅडम, विजय मुळे, प्रशांत मुळे, शिक्षक, विध्यार्थी, पालक व नागरिक उपस्थित होते


